दिवाळी अभ्यंग फक्त 699 / – मध्ये
कणकवली ( प्रतिनिधी): दिवाळीनिमित्त माधवबाग च्या वतीने दिवाळी अभ्यंग थेरपी फक्त 699 / – ची ऑफर दिली आहे.अभ्यंग म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणारे तेलाचे मालिश होय. माधवबाग च्या वतीने अभ्यंग मध्ये स्नेहन म्हणजेच शास्त्रोक्त पद्धतीने तेलाने मालिश आणि स्वेदन म्हणजेच मालिश नंतर शरीराला दिली जाणारी स्टीम . 10, 11 , 13, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत अभ्यंग केले जाणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या थंडीमुळे वाताचे अनेक विकार वाढतात, त्वचा कोरडी पडते, फुटते.अभ्यंग केल्याने हे सर्व त्रास कमी होतात.त्वचा मुलायम होऊन रंग उजळतो. शरीराचा आणि मनाचा थकवा कमी होऊन चांगली झोप लागते.भूक वाढते, तब्बेत चांगली होते.डोळ्यांचे आरोग्य सुधारते. म्हातारपणी वाढणारा वाताचा त्रास कमी होतो. यासाठीच आयुर्वेद शास्त्रात थंडीच्या ऋतूत अभ्यंग करायला सांगितले आहे. दिवाळीतील अभ्यंग आणि त्यानंतर करायची आंघोळ म्हणजेच अभ्यंग स्नान.ही केवळ परंपरा नसून आयुर्वेद शास्त्राची सायंटिफिक उपचार पद्धती आहे.म्हणूनच माधवबाग या दिवाळीनिमित्त खास अभ्यंग ची ऑफर दिली आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून कणकवली मोबा. 9373183888 / कुडाळ मोबा. 9011328581 / सावंतवाडी मोबा. 7774028185 वर संपर्क साधावा












