सुकन्येचे प्रताप सीसीटीव्हीत पाहून फुटला घाम ; वस्तूंची किंमत अदा करून केली सेटलमेंट
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एका मोठ्या पक्षाच्या जिल्हास्तरीय महिला पुढारी च्या सुकन्येने तालुका शहरात ” वेल “फेमस “नेस ” असलेल्या स्टोअरमध्ये वस्तू खरेदी करताना काही वस्तू हातोहात चलाखी ने पर्समध्ये टाकल्या. सीसीटीव्हीत आपल्या सुकन्येचे प्रताप पाहून त्या महिला पुढारी ने झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत स्टोअर च्या नियमांनुसार त्या वस्तूचे पेमेंट करून विषयावर पडदा टाकला. बड्या घरची लेक असलेल्या त्या युवती ने पर्समध्ये टाकलेल्या वस्तूंचे पेमेंट न करता त्या स्टोअरमधून पोबाराही केला. मात्र स्टोअरमधील सीसीटीव्हीत त्या युवतीने केलेले चौर्यकर्म कैद झाले होते.दिवसभराच्या विक्री आणि हिशोबाचा ताळमेळ घालताना स्टोअर च्या मॅनेजर आणि सेल्समन यांना तफावत लक्षात आल्यानंतर त्यांनी स्टोअर मधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्या युवती ने केलेला प्रताप उघड झाला. ती युवती कोण याचा शोध सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे घेतल्यानंतर एका राजकीय पक्षाची जिल्हास्तरीय पदाधिकारी महिलेची लेक असलेली ती युवती उच्चभ्रू आणि सुस्थित कुटुंबातील असल्याचेही समजून आले. त्यानंतर राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेल्या त्या युवतीच्या मातोश्री ला याबाबत संबंधित स्टोअरमधून कल्पना दिल्यानंतर माझी मुलगी असे करणारच नाही, तुम्ही नाहक आळ घेता असा पवित्रा घेत त्या महिला पुढारी ने सुरवातीला स्टोअर वाल्यानाच दमात घेतले. अखेर सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर मात्र त्या महिला राजकीय पदाधिकारीला आपल्या लेकीचं प्रताप पाहून घाम फुटला. चोरीची केस दाखल होण्यापेक्षा स्टोअर च्या नियमानुसार त्या वस्तूंची किंमत अदा करून विषयावर पडदा टाकला. मात्र झाल्या प्रकाराची तालुका शहरासह परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.











