“उमेद फौंडेशन,सिंधुदुर्ग” कडून कणकवली येथील कातकरी वस्तीत “दिवाळी फराळ वाटप” चा शुभारंभ…!

कणकवली (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्या वर्षी उमेद फौंडेशन कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटण्याची मोहिम राबवण्यात आली. या वर्षी उमेद सदस्यांनी कणकवली येथील गणपती सान्याजवळील झोपडपट्टीतील कातकरी गरजू कुटुंबातील सदस्यांना दिवाळी फराळ वाटून त्यांच्या अंधारमय जीवनात तेजोमय प्रकाश आणण्याचे काम केले. सडा रांगोळी घालून,आकाशकंदिल,दिवेलावून ,तेथील वंचितांना दिवाळी फराळ कीट, स्वच्छता कीट वाटप करण्यात आले. त्यावेळी तेथील गरजू कुटुंब व बालगोपाळांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले. दिवाळी कीट मध्ये अंघोळीचा मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील, पणत्या, लाडू , चिवडा, चकली, शंकरपाळी इ. वस्तू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि मनोरुग्ण आश्रम या ठिकाणी दिवाळी कीट वाटण्यात येणार आहे.

या वेळी सूर्यकांत चव्हाण, ए डी राणे, विजय मसुरकर, विजय भोगले, विनायक जाधव, अजित कदम,हेमंत राणे, प्रतिभा कोतवाल, वंदना राणे, पालव मॅडम, महाजन सर, करंबेळकर मॅडम, प्रदीप नाळे, राजेंद्र पाटील, युवराज पंचकर, जयकुमार पाटील, शैलजा कदम, स्वप्निल तोडकर, राजेंद्र पाटील, जाकीर शेख, जेडी पाटील, शितल पाटील, शोभा पाटील, स्वाती पाटील, नितीन पाटील हे उमेदीयन उपस्थित होते. दिवाळी मोहिमेचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्व देणगीदार,उमेदीयन, पत्रकार यांचे आभार मानले.

उमेद फाउंडेशन तर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीट वाटप वंचित कुटुंबांना, आश्रमांना गरजेनुसार मदत, क्रीडा स्पर्धा वेळी “प्रथमोपचार कीट” वाटप, राज्यभरातून “उमेद मायेचं घर” येथील वसतिगृह येथे 27 गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश असे अनेक विविध उपक्रम राबवले जातात. उमेद फाउंडेशनच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!