के सी सी मित्र मंडळ व कपिलेश्र्वर मित्र मंडळ खारेपाटण यांचा सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री १२.०० नंतर स्थानिक मंडळांच्या वतीने मोठ मोठे नरकासुर राक्षसाच्या प्रतिमा बनवून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी करत दहन करण्यात आले.यामध्ये युवा वर्गाचा मोठा सहभाग होता. खारेपाटण येथील के सी सी मित्र मंडळ कोष्ट्येवाडी,खारेपाटण यांनी बनविलेला नरकासुर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.तर कपिलेश्वर प्रसादिक मंडळ कपिलेश्वरवाडी खारेपाटण यांनी देखील बनविलेली नारकसुरचा प्रतीकात्मक पुतळा सुंदर बनविण्यात आला होता. खारेपाटण एस टी बस स्थानक येथे वाजता गाजत हे नरकासुराच्या प्रतिमा पुतळे आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत दिवाळीचा आनंद सर्वांनी लुटला.व रात्री १२.०० नंतर नरकासुर पुतळ्याचे सामुदायिक दहन करण्यात आले. यावेळी खारेपाटण नागरिक सुधा या उस्त्वात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.














