शिशुविकास विद्यामंदिर सांद्रेवाडी शाळा व भडगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथील कु. भरत उर्फ अक्षय जनार्दन सावंत यांची नुकतीच आसाम रायफल्स मध्ये निवड झाली असून तो आता भारतीय सैन्य दलात सेवा बजावणार आहे. अक्षय सावंत याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चार वर्षे खडतर परिश्रम करून हे यश संपादन केले आहे. शिशुविकास विद्यामंदिर भडगाव सांद्रेवाडी शाळेचा विध्यार्थी असलेल्या कु. अक्षय सावंत याने मिळवलेल्या या यशाबद्दल सांद्रेवाडी शाळेचे अध्यक्ष तुकाराम सावंत, सचिव श्री. निलेश लोट, माजी अध्यक्ष, कृष्णा नारायण लोट, भडगाव सरपंच गुणाजी लोट तसेच भडगाव सांद्रेवाडी व भडगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने अक्षय सावंत यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
