एल.एम.नाईक स्मृतिप्रीत्यर्थ साद फाऊंडेशन चा उपक्रम
कुडाळ (प्रतिनिधी): एल. एम. नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग तर्फे कुडाळ नगरपंचायतीच्या सफाई कर्मचार्यांना दिवाळी साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले.साद फाऊंडेशन चे सचिव सचिन कोर्लेकर, खजिनदार गौरेश नाईक,सदस्य लतिका नाईक, दिपाली नाईक,वर्षा तळेकर,अपूर्वा गोलतकर, प्रवीण कोरगावकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, साद फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा न.पं.च्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, अभियंता विशाल होडावडेकर, लेखापाल स्वप्निल पाटील, कर विभाग प्रमुख दत्ताराम महाडेश्वर, पाणी पुरवठा विभाग प्रमुख संजय हेरेकर, लिपीक सागर कुंभार,प्रसाद नाईक, गजानन पेडणेकर, निकीता आळवे,वामन राणे,अभियंता संकेत गावडे, संजय टेंबुलकर, हनुमंत पाटकर, अंजली परब, मुकादम विलास मुणगेकर,दिपक कदम,प्रवीण कोरगावकर, तुकाराम शिरसाट, सतीश जाधव, गिरीश केसरकर, रोहीत परब, शैलेश नेवाळकर, विनायक मांजरेकर, नेहा सोलकर, सुहानी सावंत, सबा शाहा,पुष्पराज कुडाळकर,यशवंत कुडाळकर आदि उपस्थित होते. यावेळी कुडाळ नगरपंचायतच्या एकूण ४० सफाई कर्मचा-यांना फराळ, मोती साबण, उटणे यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सफाई कर्मचारी यांच्यामध्ये एक आनंदाचे वातावरण होते.सर्व सफाई कर्मचारी यांनी साद फाऊंडेशनचे आभार मानले.












