चौके बाजारपेठ येथे 16 नोव्हेंबर रोजी तिरंगी डबलबारी भजनाचा सामना

श्री सत्यनारायण महापूजा – सांस्कृतिक कार्यक्रम – चौके बाजारपेठेचे आयोजन

चौके ( अमोल गोसावी ) : प्रतिवर्षाप्रमाणे आदर्श व्यापारी संघ चौके यांच्यावतीने दीपावलीनिमित्त गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी चौके बाजारपेठ येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ठीक 10.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी ठीक 12:30 वाजता महाआरती सायंकाळी 4.00 वाजल्यापासून सुस्वर भजने तसेच सायंकाळी ठीक 7.00 वाजता संगीत तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा विशाल मसुरकर – विठ्ठल रखुमाई प्रसादिक भजन मंडळ, देवीपाडा बोरवली विरुद्ध बुवा दुर्वास गुरव श्री विमलेश्वर प्रसादिक भजन मंडळ वाडा तालुका देवगड विरुद्ध बुवा चंद्रकांत जाधव ओम साई लीला प्रासादिक भजन मंडळ भांडुप यांच्यात चौके बाजारपेठ येथे तिरंगी डबलबारी चा सामना रंगणार आहे. तरी पंचक्रोशीतील ग्राहकांनी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आदर्श व्यापारी संघ चौके यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!