राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू – अबिद नाईक

कुडाळ मधील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

कुडाळ (प्रतिनिधी): ज्या विश्वासाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार गट पक्ष प्रवेश केला आहे त्या विश्वासात आम्ही जाऊ देणार नाही असे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कुडाळ येथे सांगितले. कुडाळ शहरातील विराज बांदेकर, प्रथमेश माने, जावेद इक्बाल मेमन, यश मडवळ, सुरज राऊळ, रविराज सावंत, कार्तिक केसरकर, रूवेद पारकर यांच्यासह अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. जिल्हा संघटक काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे. कुडाळ तालुका प्रमुख आ के सावंत, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे,श्री अणावकर गुरूजी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सफराज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!