खारेपाटण (प्रतिनिधी): भारतातील चार राज्यांत कार्य करणा-या तिरूमला तिरूपती मल्टिस्टेट क्रेडिट को.आँप.लि.या संस्थेतील व्हि-वन ग्रृपच्या सदस्यांनी यावेळी दिवाळी सणाचा आनंद समर्थ आश्रमातील बांधवांसह साजरा केला. याप्रसंगी संस्थेचे पुर्वा सावंत ,नरेश बने आणि नरेंद्र कदम आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सभोवती अंधार दाटलेला असताना समाजातील वंचितासह दीपावलीचा आनंद साजरा करून त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य तिरूमला तिरूपती मल्टिस्टेट क्रेडिट को.आँप.सोसा.लि.संस्थेच्या प्रत्येक सदस्याने केले पाहिजे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गुरमित सिंग,डायरेक्टर कपिल झवेरी आणि व्हि-वन गृपचे पार्टनर देवांग चोरघे यांनी सर्व सभासदांना आणि कार्यकर्त्यांना केले.. हा संदेश लक्षात घेवून तिरूमला तिरूपती मल्टिस्टेट को.आँप.क्रेडिट सोसायटी लि.च्या व्हि वन गृपने आज जीवन आनंद संस्था संचलित समर्थ आश्रमातील बांधवांसह दिवाळीचा आनंद साजरा केला असल्याचे नरेश बने,पुर्वा सावंत आणि नरेंद्र कदम यांनी यावेळी सांगीतले. व्हि वन गृपचे सदस्यांच्या वतीने आश्रमातील बांधवांसाठी आज दीपावली प्रसंगी सुग्रास भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमात आलेल्या प्रत्येक सदस्याने दिवे पेटवून आणि स्वहस्ते बांधवांना जेवण वाढण्याचे कार्य केले.बांधवांची विचारपूस केली. समर्थ आश्रमातील दीपावली कार्यक्रम प्रसंगी तिरूमला तिरूपती मल्टिस्टेट को.आँप.क्रेडिट सोसा.लि. च्या व्हि वन गृपचे सदस्य पुर्वा सावंत,नरेश बने, पराग सावंत, विजय सावंत, दीपक कदम, नरेंद्र कदम, सत्यवान रगजी, कु,क्रीशा सावंत….यांचेसह समर्थ आश्रमचे किसन चौरे,भाईदास माळी, दिपाली मेघा,दीपक अडसुळे, चंदा छेत्री यांची उपस्थीती होती. समर्थ आश्रमचे कार्यकर्ते किरण आरोलकर आणि लहु सांडिम यांची कार्यक्रमाच्या संयोजनात महत्वाची भूमिका राहीली.















