आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार सावंतवाडी तील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार…..!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक श्रीकांत भारतीय यांच्या उपस्थितीत सावंतवाडी विधानसभा भाजपा कार्यालय येथे शुक्रवार दि. १७|११|२३ रोजी, सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विधानसभा प्रमुख राजन तेली, महीला जिल्हाध्यक्षा श्र्वेता कोरगावकर,डॉ.अमेय देसाई, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, तसेच जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्याकरिता तसेच विधानसभेतील विकासकामांच्या चर्चेकरिता सर्व सुपर वॉरियर्स,पदाधिकारी,शक्तिकेंद्र प्रमुख,तालुका स्तरीय विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर दळवी,सुहास गवंडळकर, रविंद्र मडगांवकर,अजय गोंदावळे,महेश धुरी यांनी केले आहे.

error: Content is protected !!