शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटिल यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून विस्थापित झालेल्या कुर्ली, तालुका वैभववाडी या गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नवीन ता. कुर्ली कणकवली या पुनर्वसित गावठाणात सन १९९५ साली झालेले आहे. प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी मौजे कुर्ली तालुका वैभववाडी या मुळ गावठाणातील ग्रामदेवता श्री. कुर्ली देवी मातेचा वार्षीक जत्रोत्सव रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी त्रीपुरारी पौर्णिमे दिवशी साजरा होणार आहे.यासाठी प्रवासी भक्तांच्या सोयीसाठी यात्रा स्पेशल एसटी बस फेरी सोडावी अशी मागणी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे कार्याध्यक्ष हरेश पाटिल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
यात्रेसाठी मुंबई तसेच लगतच्या जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात कुर्ली ता. वैभववाडी या ठीकाणी दर्शनासाठी जात येत असतात. तसेच नवीन कुर्ली ता. कणकवली या पुनर्वसित गावठाणातील भाविक भक्तांना यात्रोत्सवास जाणे सुलभ व्हावे यासाठी रविवार दिनांक- २६/११/२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजल्या पासुन नवीन कुर्ली ते कुर्ली अशी यात्रा स्पेशल गाडी सोडण्यात यावी. सदर यात्रा स्पेशल गाडी गेल्या अनेक वर्षापासुन सोडण्यात येते तशीच या ही वर्षी सोडण्यात यावी अशी सर्व ग्रामस्थ आणी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आग्रहाची मागणी आहे. तरी प्रवासी भक्तांच्या सोयीसाठी एसटी बस फेरी सोडावी अशी मागणी निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे.
नविन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना अध्यक्ष रवींद्र नवाळे, नविन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना सचिव आनंद सावंत, नविन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना कार्याध्यक्ष हरेश पाटिल यावेळी उपास्थित होते.










