कणकवलीत 2 डिसेंबर रोजी बच्चेकंपनीसाठी खाऊगल्ली

समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत एक दिवस छोट्यांचा या अंतर्गत दिवस खाऊगल्ली शनिवार 2 डिसेंम्बर रोजी गणपती साना येथे सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. खाऊगल्ली चे उदघाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार आहे. खाऊगल्लीत सहभागी होणाऱ्या पहिल्या 600 मुलांना 50 रु. चे मोफत कुपन दिले जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभि मुसळे, बंडू गांगण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजू गवाणकर आदी उपस्थित होते. मुलांच्या मनोरंजनासाठी जादूगार शो होणार असून पुणे येथील गायकांचा गीत नजराणा सादर होणार आहे. मिकी माउस सोबत मुलांना धमाल करता येणार आहे. कार्टून कडून मुलांना चॉकलेट वाटप केले जाणार आहे. खास मुलांसाठी ऑन दि स्पॉट लकी ड्रॉ काढून बक्षिसेही दिली जाणार आहेत. मुलांना मोफत टॅटू सुद्धा काढून दिले जाणार आहेत.घसरगुंडी, झोपाळा आदी खेळ सुद्धा असणार आहेत. पिझ्झा, पाणीपुरी, भेळपुरी, शोरमा, चायनीज, तंदूर चिकन 65, स्नॅक्स, आईस्क्रीम, कोल्डिंक्स सह अन्य खाऊची टेस्ट चाखता येणार आहे. स्टॉल साठी जागा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

error: Content is protected !!