इन्सुलि एक्साईज पथकाची मळेवाड जंक्शन जवळ कारवाई
कणकवली (प्रतिनिधी): गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करताना प्रदीप निग्रे ( वय 57, रा खारेपाटण कोष्टी आळी , ता कणकवली ) याला इन्सुलि चेकपोस्ट एक्साईज च्या पथकाने रंगेहाथ पकडले. प्रदीप निग्रेकडून 2 लाख 24 हजारांची दारू आणि 8 लाखांची बलेनो कार असा एकूण 10 लाख 24 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इन्सुलि चेकपोस्ट च्या पथकाने ही कारवाई 23 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता मळेवाड जंक्शन आरोंदा मळगाव रोडवर केली.












