कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथील शिवसैनिक प्रदीप हरमलकर यांना शिवसेना (उबाठा )उप तालुका प्रमुख पदी नियुक्ती पत्र शिवसेना ( उबाठा) जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर यांनी दिले त्या वेळी अल्प संख्यांक जिल्हा प्रमुख मज्जिद बटवाले, उप विभाग प्रमुख तात्या निकम, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, शाखा प्रमुख हनुमंत म्हसकर,संजय डगरे इमाम नवलेकर, हेमंत कांडर, सचिन परब, सुरेश मेस्त्री, आबू मेस्त्री, लक्ष्मण लोके, अनिल नरे, विजय डामरे व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.













