जरा याद उन्हे भी कर लो

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना ” आम्ही कणकवलीकर ” यांच्या वतीने श्रद्धांजली

कणकवली (प्रतिनिधी) : “आम्ही कणकवलीकर ” यांच्या वतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना रविवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात मेणबत्ती प्रज्वलित करत उपस्थित सर्व नागरिकांनी श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच यावेळी संविधानाची शपथही घेण्यात आली.

‘आम्ही कणकवलीकर परिवारा’ च्यावतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून ‘वंदे मातरम’ ची प्रतिकृती सादृपुरण्यात आली होती.

यावेळी जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा खोत, बाळू मेस्त्री, धाकू तानवडे, हनिफ परिखान, रुपेश खाडये, मनोहर पालपेकर, दादा कुडतडकर, वि.के. सावंत, दादा कोरडे, संजय मालंडकर, सादिक कुडाळकर, सिद्धी वरवडेकर, वसुधा माने, श्रद्धा हजारे, संदीप सावंत, रंजन चिक्के, दिलीप साटम, विलास उगरे, प्रा. मोहन कुंभार, विजय घाडीगांवकर, सुगन्धा देवरुखकार, बंद्रकांत चव्हाण, प्रमोद लिमये, सखाराम सकपाळ, लवू वारंग, सुनिल काणेकर, डॉ. विद्याधर तापशेट्ये, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगन, कमलाकर तांबे, जगदीश राणे, भालचंद्र पेडणेकर, रवींद्र उगरे, ऋता खोत, राजेंद्र पेडणेकर, अनुप वारंग, डॉ. सुहास पावसकर, ऍड. विलास परब, प्रा. रवींद्र मुंबरकर, नामानंद मोडक, बाळू पारकर, केपुर काकतकर, कोमल काकतकर, शीतल मांजरेकर, पोलीस उपनिरीक्षक रवी शेडगे, शरद देठे, पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे, विनोद चव्हाण, आर. के. पाटील, चंद्रकांत माने, खेहा राणे यांच्यासह माऊली मित्रमंडळ व व्यापारी मित्रमंडळाचे कार्यकर्ते व कणकवलीतील अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना सिद्धी वरवडेकर यांनी संविधानाची शपथ दिली. तर धाकू तानवडे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा खोत व पोलिस उपनिरीक्षक रवी शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!