सोनू सावंत मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष तथा वरवडे गावचे सुपुत्र राजेंद्र उर्फ सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त 28 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिरासह विविध सेवाभावी कार्यक्रम सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. सोनू सावंत म्हणजे वरवडे गावच्या युवाईच्या गळ्यातील ताईत जणू. 28 नोव्हेंबर हा सोनू सावंत यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांनी सोनू सावंत यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने साजरा केला जातो. मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच आपला लाडका युवा नेता सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे गावातील जिल्हा परिषद च्या तिन्ही प्राथमिक शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.