तेलंगणाच्या कुरुक्षेत्रात कोकणचा राणे पॅटर्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आमदार नितेश राणे यांना शाब्बासकीची थाप

तेलंगणा पेद्दापल्ली मधील उमेदवारांच्या प्रचाराची धुरा आहे आमदार नितेश राणेंवर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): तेलंगणा- पेद्दापल्ली विधानसभेचे उमेदवार श्री प्रदीप राव यांच्या सह पेद्दापल्ली जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या कामाची भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखल घेत अभिनंदन केले. पेद्दापल्ली येथे कलेक्टर ऑफिस ग्राऊंडवर हेलीकॉप्टरने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन झाले तेव्हा आमदार नितेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रचाराची जबाबदारी असलेल्या मतदार संघांची वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान प्रचार मोहिमेत आघाडी घेतल्या बद्दल आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन केले. आमदार नितेश राणे हे गेले काही दिवस तेलंगणा- पेद्दापल्ली येथे ठाण मांडून बसले आहेत.प्रचारात सक्रिय करत भाजपच्या उमेदवारांना विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक भाजपाचे नेते उपस्थित आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असून घराघरात कमळ निशाण चिन्ह पोचविण्यात यश मिळवले आहे.

error: Content is protected !!