सार्वजनिक आर सी सी बांधकाम केलेली वीहीर अचानक कोसळली

नांदरूख रेवटी वाडी येथील घटना- ग्रामस्थांचे पाण्याचे हाल

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील नांदरुख रेवटी वाडी येथील घरांना पूरक नळ पाणी योजना असलेली चालू वर्षी आर सी सी बांधकाम केलेली विहीर रविवारी सायंकाळी अचानक कोसळली सुदैवाने पाणी भरण्यास कोणी गेले नसल्याने जीवितहानी टळली. सदरील विहिरी शेजारील भूभाग कोसळला असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. सदरील विहिरीची खोदाई करण्यात आली होती मात्र आरसीसी बांधकामाच्या खाली दगडी बांधकाम केले गेले नसल्याने व शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे ही विहीर पूर्णतः खचली. याठिकाणी सायंकाळच्या सुमारास शेजारील ग्रामस्थ तसेच कामगार लोक लहान मुलांसह पाणी भरण्यास येतात यावेळी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. ग्रामस्थांचे पाण्याचे हाल तर परिसरही बनला धोकादायक नांदरुख रेवटीवाडी येथील येथील ही ग्रामपंचायत मालकीची पूरक नळ पाणी योजना राबविण्यात येणारी विहीर असून तसेच येथील घरांना बारमाही पाणी वापरण्यासाठी एकमेव वीहीर असल्याने आता ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होणार आहेत. तसेच येथील परिसरही धोकादायक बनला आहे. विहीर खोदाईचा निष्काळजीपणा या कामाची चौकशी व्हावी विहीर खोदायीचे काम घेऊन कामात निष्काळजीतपणा केल्यामुळे सदरील विहीर कोसळली आहे तरी या विहिरीच्या कामाची चौकशी व्हावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!