४१ व्यक्तीमत्वांचा उलगडणार ” स्नेहबंध “

माजी मुख्याध्यापिका वासंती किणीकर लिखित स्नेहबंध पुस्तकाचे वराडकर हायस्कूल कट्टा येथे प्रकाशन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वासंती किणीकर लिखित गुरुजन आणि सहकारी शिक्षक अशा ४१ व्यक्तीमत्वांबद्दल कृतज्ञता मांडणारे ” स्नेहबंध ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध साहित्यिक , कवी अजय कांडर यांच्या हस्ते वराडकर हायस्कूल कट्टा च्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर लेखिका वासंती किणीकर , संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर , उपाध्यक्ष तथा सरपंच शेखर पेणकर , सचिव सुनिल नाईक , खजिनदार रवींद्रनाथ पावसकर , सहसचिव साबाजी गावडे , संचालक शिवराम गुराम, महेश वाईरकर, स्वाती वराडकर , पेंडूर हायस्कूल संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे प्रमुख कार्यवाह दिपक भोगटे , कवयित्री व लेखिका तांबे विजयश्री देसाई , स्कूल कमिटी चेअरमन बापू वराडकर , माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल फणसेकर , माजी मुख्याध्यापक सर्जेराव पाटील , सुरेश कदम , वराडकर काॅलेजचे प्राचार्य जमदाडे , इंग्लिश मेडि. चे मुख्याध्यापक ऋषीकेश नाईक, संजय नाईक , तसेच माजी विद्यार्थी , सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि कल्पवृक्ष देउन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्याध्यापिका वासंती किणीकर लिखित स्नेहबंध या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी असे प्रतिपादन केले कि , ” सध्याच्या नातेसंबंध कोरडे होत चाललेल्या काळात किणीकर यांनी आपले गुरुवर्य आणि सहकारी शिक्षक यांच्या बद्दल अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहपुर्वक संबंध उलगडून सांगणारं स्नेहबंध हे पुस्तक लिहीलं ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. मुळात त्यांच्या मनात दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा असल्यामुळेच त्यांच्याकडून हे लिखाण होऊ शकलं. तांबे आणि किणीकर यासारख्या साहित्यीका या हायस्कूलला शिक्षिका म्हणून लाभल्या हे या शाळेच भाग्यच आहे. किणीकर च्या पुस्तकास प्रकाशित करण्यासाठी संस्था पदाधिकारी आणि मुख्याध्यापक, शिक्षकांनी जे प्रोत्साहन दिले तेही कौतुकास पात्र आहेत. यावेळी वराडकर हायस्कूल चे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी नुकतेच २५० बालकलाकारांचा सहभाग असलेले शिवचरित्रावरील महानाट्य यशस्वीरीत्या सादर केल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी सन्मानचिन्ह देउन गौरव केला.

error: Content is protected !!