वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक संजय नाईक यांना उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान.

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून सन्मानित

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दिला जाणारा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक संजय नाईक यांना नुकताच अनंत केळकर हायस्कूल वाडा देवगड येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे कार्यवाह शिवशरण बिराजदार ,प्रवीण आंबोळे, डॉक्टर दीपक शेटे , वामनराव खोत – अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ , तुकाराम पेडणेकर- कार्यवाह सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ औदुंबर भागवत ,अनंत केळकर हायस्कूल वाडा चे मुख्याध्यापक नारायण माने , प्रसाद कुबल अध्यक्ष मालवण तालुका गणित अध्यापक मंडळ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणित संबोध , प्राविण्य ,गणित प्राज्ञ परीक्षा अशा अनेक परीक्षा यशस्वीपणे आयोजित केल्या जातात आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार केला जातो. शिक्षकांसाठी चर्चा सत्रे, शिबिरे आयोजित केली जातात. उपक्रमशील गणित शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक अशा प्रकारे गणित विषयासाठी सतत कार्यशील असणाऱ्यांचा बहुमान गणित मंडळांच्या वतीने करण्यात येतो.

संजय नाईक यांना मिळालेल्या उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्काराबद्दल त्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा मधील सर्व आजी, माजी पदाधिकारी, सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी , पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!