संविधानाचे देशावर फार मोठे उपकार.! – जयेंद्र रावराणे

संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

वैभववाडी संविधान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळ यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले यामध्ये अ.रा.विदयालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे विदयार्थी, शिक्षक यांच्यासह तालुका संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  सहभागी झाले होते.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी बांधकाम सभापती तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे म्हणाले, आपला देश हा भारतीय संविधानावर चालत आहे. त्यांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत. आजच्या तरुण पिढीने संविधानाचा अभ्यास करुन त्यानुसार वाटचाल केली पाहीजे.
या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेच्या दहा विदयार्थ्यांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली तसेच मा.सभापती जयेंद्र रावराणे व ग्रामीण कार्याध्यक्ष सुभाष कांबळे यांच्या हस्ते बौद्ध विहार परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भास्कर जाधव,वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे , कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, शिक्षक संघटनेचे नेते शरद नारकर, मुख्याध्यापक नादकर बी.एस. व वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे कार्यकर्ते, विद्यार्थी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!