एक दिवस छाेट्यांसाठी खाऊगल्ली चे आ. नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन
हजाराेंच्या संख्येने बच्चे कंपनीची उडाली झुंबड
कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेल्या गणपती सान्यावरील एक दिवस छोट्यांसाठी खाऊगल्ली! चा कार्यक्रम अभुतपूर्व जल्लोषात आनंदायी वातावरणात होत असलेला एक दिवस छोट्यांसाठी खाऊगल्ली! चा अनुभव कणकवलीकराना अनुभवायला मिळाला.
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित ‘एक दिवस छोट्यांसाठी’ खाऊ गल्ली उपक्रमाचे! शनिवारी सायंकाळी पालक – पाल्य हे थेट गणपती सान्यावर दाखल झाले. विविध घसरगुंडी, पाळणा यांसारखे खेळ खेळून, कार्टुन, सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी रेंगाळणारी छोट्या मुलांनी खाऊ गल्लीतील खाद्य पदार्थांवर अक्षरशः ताव मारला, खाऊगल्ली कार्यक्रमात होत असलेल्या धम्मालीचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमाला नागरिकांचा देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की जणू की, खाऊ गल्लीचे स्वरूप मोठ्या गजबजलेल्या जत्रोत्सवासारखे झाले.
सदरचा कार्यक्रमासाठी सिंधू संकल्प अकादमी प्रस्तुत रोलर्स म्युझिकचे गायक संज्योती जगदाळे, हर्षद मेस्त्री, साक्षी मांजरेकर, निवेदक संजय धुरी यांनी विविध गाणी सादर करत लहान मुलांसह आजूबाजूचा परिसर दुमदुमून सोडला.
आ. नितेश राणेंनी केले समीर नलावडे मित्रमंडळाचे कौतुक
कणकवली शहरातील गणपती सान्यावर आयोजित केलेल्या ‘एक दिवस छोट्यांसाठी’ खाऊगल्ली, सोबत संगीत जल्लोष उपक्रमाचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते एका अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले. चॉकलेटचा खजाना भरलेली पेटी आ. नितेश राणे यांच्या हस्ते उघडुन उपक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, समीर नलावडे यांचं किती कौतुक करायचं याबाबत आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे. कारण की दर एक दोन महिन्यानंतर कणकवलीकरांसाठी विविध उपक्रम घेऊन येत असतात. अनेक वेळा राजकारणामध्ये आपण पाहतो पद मिळाल्यानंतर पद असेपर्यंत लोकांची सेवा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी करतात आणि ते पद गेलं की मतदारांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. मात्र समीर नलावडे यांच्या कामाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी जे संस्कार आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दिले की, पद असो किंवा नसो सातत्याने लोकांची सेवा करत राहा. लोकांच्या आयुष्यात चांगले क्षण आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न यापुढेही नक्की करू.
मागील पाच वर्षे आणि आता जर कणकवली शहराकडे जर पाहिलं तर सगळ्याच बाबतीत कणकवली शहर हे अग्रेसर व विकसनशील शहर म्हणून आपल्या शहराची ओळख बनत चालली आहे. मग ते रस्त्यांची जाळी किंवा विविध उपक्रम असो सामान्य जनतेच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचे काम शब्दाच्या पलीकडे कृतीतून करण्याचं काम समीर नलावडे, बंडू हर्णे व त्यांच्या नगरसेवकांनी केलेलं आहे. खाऊगल्लीचे हे चौथ वर्ष आहे. याठिकांणचा उत्साह पहिला तर अशा पद्धतिचा कार्यक्रम मुंबईमध्ये देखील होत नसेल. अस चांगलं उत्तम नियोजन समीर नलावडे, व त्यांच्या टीमने केलेलं आहे अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी कौतुक केले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभि मुसळे, किशोर राणे, संजय कामतेकर, बंडू गांगण, बाबू गायकवाड, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, प्राची कर्पे, साक्षी वाळके, प्रतीक्षा सावंत, राजू गवाणकर, शिशिर परुळेकर, मिलिंद मेस्त्री, समीर प्रभुगावकर, संदीप मेस्त्री, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, पंकज पेडणेकर, राज नलावडे, रवींद्र म्हाडेश्ववर आदी उपस्थित होते.












