सामाजिक बांधिलकी जपत वैभववाडी तालुक्यातील यंदाचा पहिला कच्चा बंधारा रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांनी केला पुर्ण

रोटरी क्लब व नावळे ग्रामपंचायत यांनी बंधारा बांधून आदर्श निर्माण केला- मनोजकुमार बेहरे

वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही मोहिम सक्षम रित्या राबविण्यासाठी नोव्हेंबर पासून कच्चे बंधारे बांधून पाणी अडविण्याची विशेष मोहिम राबविली जाते. वैभववाडी तालुक्यामध्ये रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नावळे ग्रामपंचायत यांनी नावळे येथे कच्चा बंधारा बांधून या मोहिमेची चांगली सुरुवात केल्या बध्दल पंचायत समिती वैभववाडी चे गटविकास अधिकारी मनोजकुमार बेहरे यांनी बंधा-याला प्रत्यक्ष भेट देऊन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ ग्रामपंचायत नावळे यांचे विशेष कौतुक केले.

नावळे येथे कच्चा बंधारा बांधल्याने या ठिकाणी माठया प्रमाणात पाणीसाठा होणार असून शेतीसाठी याचा शेतक-यांना मोठा लाभ होणार आहे. तालुक्यातील पहिला बंधारा बांधण्यासाठी नावळे गावाची निवड करुन चांगल्या प्रकारचा बंधार बांधल्याबध्दल रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे व गटविकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी यांनी प्रत्यक्ष बंधा-याच्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केल्या बध्दल सरपंच सोनल गुरव यांनी आभार मानले.

 वैभववाडी तालुक्यातील नावळे येथे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व ग्रामपंचायत नावळे यांच्या वतीने नावळे नदीवर कच्चा बंधारा बांधणेत आला. या वेळी सरपंच  सोनल गुरव, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट संजय रावराणे, ट्रेझरर  प्रशांत गुळेकर, चार्टर्ड प्रेसिडेंट संतोष टक्के, रोटरियन विध्याधर सावंत, सचिन रावराणे, मुकुंद रावराणे, मंगेश कदम, बंडया सावंत, संजय सावंत, प्रशांत कुळये, तेजस आंबेकर,ग्रामसेवक घुगे, ग्रा. प. सदस्य संजय शेळके, ग्रामस्थ विलास गुरव, रमेश गुरव, गणपत पाटील, भिकाजी गुरव, आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!