देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर मंदिर ते कुणकेश्वर शाळा खालचीवाडीकडे जाणाऱ्या रस्ता खचल्याने संरक्षक भिंत कोसळले व त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणारा चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी झाल्याची घटना आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनसार, कुणकेश्वर मंदिर ते कुणकेश्वर शाळा खालची वाडी येथील रस्त्याच्या बाजूने असलेले कंपाऊंड वाल (संरक्षण) खचल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणारा चिरे वाहतुक डंपर कोसळल्याने पलटी झाला.डंपर पलटी झाल्याने डंपर मधील चिरे अस्तावस्त पडलेले होते.सुदैवाने डंपर जिथे पलटी झाला ते समोरील घर बंद असल्याने अनर्थ टळला.कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेकालावधीत हा vip रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो. या मार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी वेळोवेळी जि प बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र जि प बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. यात्रा कालावधित यारस्त्याच्या डांबरी करण्यासाठी १५ लाखाचा निधी मंजुर झाला त्याप्रमाणे कामही झाले. मात्र निधी कमी असल्याने संरक्षण भिंतीचे काम झाले नव्हते. ही भिंत कुमकुवत व नादुरुस्त झाली होती.या संरक्षण भिंतीचे काम तात्काळ करण्यात यावे. अशी मागणी कुणकेश्वर माजी सरपंच चंद्रकांत घाडी यांनी केली आहे.














