वैभववाडी -उंबर्डे येथे कादिर फरास, हाजी सय्यद नाचरे, रज्जब रमदुल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे येथे कादिर फरास, हाजी सय्यद नाचरे, रज्जब रमदुल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा संपन्न झाला. खा. विनायक राऊत साहेब,जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर साहेब, जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर , विधानसभा प्रमुख सतीश सावंत , युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. शिवसेना वैभववाडी तालुक्याचा मेळावा सोमवारी सकाळी उंबर्डे येथे संपन्न झाला. यावेळी हा पक्ष प्रवेश घेण्यात आला.

या पक्षप्रवेशासाठी प्रामुख्याने तालुका प्रमुख मंगेश लोके,जिल्हा कार्यकरणी सदस्य सरवणकर साहेब, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,दिगंबर पाटील साहेब, युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मज्जीद बटवाले, अल्पसंख्याक जिल्हा सचिव निसार भाई, अल्पसंख्याक तालुका प्रमुख जावेद भाई, उपविभाग प्रमुख गौस भाई, पांडुरंग पांचाळ, मयूर दळवी,शाखा प्रमुख रियाज रमदुल, बूथ प्रमुख इम्रान पाटणकर, युवा सेना प्रमुख मुराद रमदुल , सलीम रमदुल, हसन पाटणकर, सलीम पाटणकर , इमाम पाटणकर यांनी विशिष्ट प्रयत्न केले. यामध्ये हाजी सय्यद, कादिर फरास , रज्जब रमदुल, दस्तगिर रमदुल, शहाबुद्दीन रमदुल, महंमद रमदुल, हाजी अब्दुल नाचरे, हुसेन बोबडे,समीर लांजेकर, हसन नाचरे, तसेच महिला वर्ग असे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. या सर्वांचे उ.बा.ठा. सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला कोळपे गावचे सरपंच सुनील कांबळे,करीम इसफ , अतुल सरवटे, रोहित पावसकर,सरपंच जितेंद्र तळेकर ,समीर लांजेकर, शाबान राऊत तसेच तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!