कोकण फार्मास्युटिकल्स नाणोस कंपनी संस्थापक सोमकांत नाणोसकर यांचा अमृत मोहोत्सवी कार्यक्रम
कुडाळ (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मुंबई तील नोकरी सोडून नाणोस सारख्या दुर्गम भागातील पंचक्रोशी मध्ये रोजगार निर्मिती करुन राज कोकम हा ब्रॅण्ड सातासमुद्रापार नेणारे उद्योजक सोमकांत नाणोसकर यांचा आदर्श जिल्ह्यातील नवीन पीडीने घेऊन कोकणातील उद्योजकता विकास साधत रोजगार निर्मिती केली पाहिजे असं प्रतिपादन कोकण फार्मास्युटिकल्स नाणोस या कंपनीचे संस्थापक नाणोस ग्रामपंचायत माजी सरपंच समाज सेवक सोमकांत शांताराम नाणोसकर यांच्या काल अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब वेंगुर्ले चे माजी अध्यक्ष व उद्योजक सुधीर झांट्ये यांनी केले.
या कार्यक्रम सुरुवातीला पाद्यपुजन करून पुस्तक-वह्या तुला आणि केक कापुन परीवार, ग्रामस्थ, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
यावेळी झांट्ये क्याश्यू उध्योजक सुधीर झाट्ये आणि जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत यांनी आपले विचार व्यक्त केले आणि आभार सागर नाणोसकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला डॉ संजीव लिंगवत,झाट्ये कॅश्यु कंपणीचे सुधीर झाट्ये, पुणा येथील उद्योजक सत्यभारती, विक्रांत सावंत, उद्योजक आशिष शिरोडकर, डॉ. सई लिंगवत, स्वप्नप्रभा नाणोसकर,नाणोस सरपंच प्राजक्ता शेट्ये, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नाणोस उपसरपंच अमिता नाणोसकर, प्रसाद नाणोसकर, सागर नाणोसकर, उद्योजक जेमिस ,बाळु गावकर, रुपेश धर्णे, बंड्या धारगळकर, आबा केदार , कुडतरकर, विकास शिरगावकर, मदन नाणोसकर, संजय नाणोसकर, नारायण पायनाईक, शेखर पेडणेकर, संदेश नाईक, दाजी सादजी, नाथा नारोजी, संजय धुरी, दाजी शेट्ये, संदेश नाईक, बाबु सुर्वे, .सरपंच जीजी जोशी, सुरेंद्र निखार्गे, रोहन परब, पराग पडवळ, सर्वेश आजगावकर, कमलेष अमरे, सुनिल पडवळ, सचिन तळकर आदी नाणोस ग्रामस्थ, नाणोस युवा मित्र मंडळ, कंपनी कर्मचारी वृंद उपस्थित होते.












