आमदार नितेश राणेंमुळे थेट प्रक्षेपण पाहण्याचाअलभ्य लाभ
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपल्या मतदारसंघातील नागरिकांना, मालवण येथील नौसेना दिन सोहळा “याची देही- याची डोळा” पाहता यावा, यासाठी कणकवली- देवगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरिता आणि नौसेना दिनाच्या निमित्ताने, फोंडाघाट एस.टी स्टँड येथे भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता. दुपारपासूनच त्यावर प्रक्षेपण सुरू होते.मात्र मुख्य सोहळ्याचे, पंतप्रधान मोदींचे मालवण भूमीवर स्वागत, भाषण, राजकोट वरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, नौसेना कमांडोच्या धाडसी कसरती यांचे थेट प्रसारणाचा पंचक्रोशीतील तमाम अबाल वृद्धांनी गर्दी करून आनंद लुटला. या उपक्रमाचे नियोजन फोंडाघाट भाजपा पदाधिकाऱ्यांनी- कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन पार पडले…













