चिंदर ग्रामपंचायत येथे शुक्रवार 15 डिसेंबर रोजी उज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम

सहकारी खरेदी विक्री संघ मालवण चेअरमन-राजन गावकर यांची माहिती

पंचक्रोशीतील ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन

आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत चिंदर व मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान उज्वला गँस योजने अतंर्गत उज्वला गँस कनेक्शन वाटप, नविन उज्वला गँस कनेक्शन अर्ज स्विकारणे हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 15/12/2023 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत चिंदर येथे आयोजित केला आहे.

कॅम्पमार्फत-भारत गॅस एजन्सी मार्फत नवीन कनेक्शन देणे. E-KYC करणे. मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मालवण यांचे सभासद होण्यास इच्छूक असणाऱ्या व्यक्तींना सभासद करणे अशी कामे होणार असून यासाठी लाभार्थ्यांचे रेशन कार्ड( रेशनकार्ड वर 12अंकी बायोमेट्रिक नंबर असणे आवश्यक), रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या सर्वाचे आधार कार्ड, महिलेच्या नावावर चे बँक पासबुक या कागद पत्रांची आवश्यकता आहे.तरी या कॅम्पचा लाभ सर्व भारत गॅस लाभार्थीनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत चिंदर व खरेदी विक्री संघ मालवण चेअरमन राजन गांवकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!