टू व्हीलर ला जोरदार धडक देत कारचालकाचे कारसह पलायन

दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण च्या दिशेने जाणाऱ्या सफेद कलरच्या कार ने जोरदार दिल्याने जानवली रतांबि व्हाळ या ठिकाणी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी 5. 40 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता एवढी होती की ज्या दुचाकीला धडक दिली ती दुचाकीस्वार महिला जवळपास 50 फूट महामार्गावर फरफटत गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर गाडीच्या अक्षरशा चंदामेंदा झाला. मात्र धडक दिलेला कारचालक त्याच स्थितीत दिशेने कार सह पळून गेला. या अपघातामुळे महामार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

error: Content is protected !!