कणकवली (प्रतिनिधी) : आज सायंकाळी साडेपाच वाजता जानवली ( रतांबी व्हाळ ) येथे कार ने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वार अंजली अमित साळवी ( वय 37, रा. शिवाजीनगर कणकवली ) यांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी आपल्या बहिणीला जानवली रतांबी व्हाळ येथे घरी सोडून अंजली साळवी या कणकवली च्या दिशेने येत असताना कार ने जोरदार धडक देत पलायन केले. जखमी अवस्थेत अंजली साळवी याना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचाराआधीच त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी एपीआय मनोज पाटील, पोलीस नाईक रुपेश गुरव, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव, भूषण सुतार यांनी भेट देत प्राथमिक पाहणी केली.मयत अंजली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
जानवली रतांबी व्हाळ मधील अपघातात जखमी दुचाकीस्वार महिलेचे निधन












