ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ; स्वामी समर्थ मठ वायंगणीचा स्तुत्य उपक्रम!

आचरा (विवेक परब) : शैक्षणिक प्रगतीपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेत ‘शैक्षणिक उठाव ‘ उपक्रमांतर्गत दत्तक घेतलेल्या दोन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना ‘श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी’च्या वतीने शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू होते. याप्रसंगी शिक्षण आणि समाजकारणाचा सुंदर संगम उपस्थितांना पाहायला मिळाला.
​या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव वैभव जोशी,पंचायत समिती सदस्य, संस्था सदस्य तथा स्वामी समर्थ मठ वायंगणीचे अध्यक्ष दीपक सुर्वे, शाळा समिती अध्यक्ष तथा स्वामी समर्थ मठाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर, संस्था सदस्य मनोहर वायंगणकर, समृद्धी दुखंडे, मुख्याध्यापक डी.जे.टकले यांच्यासह शिक्षक वृंद आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.स्वामी समर्थ मठ वायंगणीचे अध्यक्ष दीपक सुर्वे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले,

​शिक्षण हे माणसाच्या जीवनाला आकार देणारे सर्वात मोठे माध्यम आहे. आज ‘शैक्षणिक उठाव’ उपक्रमांतर्गत मठाच्या वतीने पियुष भरत लब्दे, गौरवी भरत लब्दे या दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य दिले आहे. हा केवळ एक मदत करण्याचा भाग नसून त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या पंखांना बळ देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.​श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि मठाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आम्ही हा छोटासा खारीचा वाटा उचलला आहे. दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीला न डगमगता फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. भविष्यातही या मुलांना शिक्षणासाठी जे काही लागेल, ते पुरवण्यास स्वामी समर्थ मठ सदैव तत्पर राहील.मठाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यानी मठाच्या उपक्रमांची माहिती दिली. संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यानी शैक्षणिक उठावासाठी दानशूर दात्यानी सहकार्य करावे असे आवाहन केले​. प्रशालेचे मुख्याध्यापक डी. जे. टकले यांनी स्वामी समर्थ मठाने दाखवलेल्या दातृत्वाबद्दल आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन आभार केतकी बावकर यानी मानले.

error: Content is protected !!