जुन्या पेन्शन योजनेला कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा पाठिंबा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन ची मासिक सभा सन्माननीय सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 15 /12 /2023 रोजी कलमठ येथील पेन्शनर्स भवन मध्ये पार पडली सभेत प्रथमतः असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व कार्यकारणीचे सल्लागार दिवंगत कै. प्राध्यापक पी.बी. पाटील सर यांचे निधनना बद्दल शोक व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिनांक 17 डिसेंबर 2023 चा पेन्शनर्स डे आजच्या सभेच्या दिवशी पेन्शनर डे चे निमित्ताने उपस्थित कार्यकारणी पेन्शनर्स सदस्य व सभासद यांच्याकडून शासनाकडून मिळत असलेल्या पेन्शनर्स बाबत संवाद व चर्चा करण्यात आली. असोसिएशनचे सन्मा .सदस्य सुरेश पाटकर यांनी शासनाच्या जुन्या पेन्शनच्या धोरणाबाबत आपले विचार मांडले तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विविध संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला.पेन्शनर डे चे औचित्य साधून ज्येष्ठ पेन्शनर व कार्यकारणी सदस्य अशोक रामचंद्र राणे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी संघटनेसाठी केलेल्या कार्याचा गौरव करून दीर्घायुष्यबाबत शुभेच्छा देण्यात आल्या .पेन्शनर डे साजरा करणे संदर्भात चर्चा करण्यात करताना सन्माननीय अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी आपले भाषणातून बोलताना सांगितले की सर्वोच्च न्यायालयात दिनांक 17 डिसेंबर 1982 साली न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने पेन्शनही भीक नसून ती पेन्शनर्सनी त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला असून तो पेन्शनरचा हक्क आहे असा निर्णय दिला,तो दिवस म्हणजे 17 डिसेंबर 1982 आणि म्हणून 17 डिसेंबर हा दिवस पेन्शनर डे म्हणून आपण साजरा करीत आहोत . शासकीय कर्मचारी आपल्या आयुष्याचा तीन -चतुर्थांश काळ शासकीय सेवेसाठी देतो परंतु परंतु वृद्धापकपाळी त्याला पेन्शन न मिळण्यास मिळाल्यास त्याला निवृत्तीनंतरचे आयुष्य हलाखीचे काढावे लागेल. यासाठी सध्या सेवेत असलेले व निवृत्त झालेल्या सर्वांनी आपल्या हक्कासाठी सतर्क व जागृत राहिले पाहिजे असे परखड विचार सन्माननीय दादा कुडतरकर यांनी अध्यक्षपदावरून मांडले . सभेत सन 2024 चे पेन्शनर दिनदर्शिका छपाई बाबत चर्चा होऊन आढावा झाला सदर सभेस कार्यकारणीचे सन्मा. उपाध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव व्ही. के .चव्हाण, सन्मा.सदस्य सखाराम सपकाळ, अशोक राणे. सिद्धार्थ तांबे, महेंद्र कुमार मुरकर व देवरुखकर बाई इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!