शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील छत्रपती उर्फ राजेंद्र भगवान भोगले ( ३० ) यांचे शुक्रवारी दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, ४ विवाहित बहिणी, भावोजी, चुलती, चुलत भाऊ, चुलत बहिणी असा परिवार आहे. माजी सरपंच सत्यवान भोगले यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.
चाफेड भोगलेवाडी येथील राजेंद्र भोगले या युवकाचे निधन












