250 रुग्णांना मोफत चष्मेवाटप,120 रुग्णांची होणार मोफत मोतीबिंदू आणि 15 रुग्णांची होणार मोफत अँपेडिक्स, हर्निया ऑपरेशन
कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत व भाजपा नाटळ- सांगवे आणि हरकुळ जिल्हा परिषद आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया व चष्मे वाटप हर्निया व अपेंडीक्स तपासणी व शस्त्रक्रिया महीलांसाठी गर्भपिशवी तपासणी व शस्त्रक्रिया उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना संदेश सावंत यांच्या उपस्थितीत डॉ.विद्याधर तायशेटे यांचा हस्ते झाले.त्यावेळी डॉ.आचरेकर डॉ.प्रियांका निबरे( विवेकानंद नेत्रालय कणकवली)डॉ.विजय पगारे( जिजाऊ संस्था ठाणे)डॉ.गुरुदास मुरकुटे(ऑप्टे शियन)डॉ.अनुजा भोसले(प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी),डॉ.चोडणेकर, सांगवे सरपंच बाबु सावंत,उपसरपंच अभिजित काणेकर, माजी सरपंच विजय भोगटे,दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर,उपसरपंच तुषार गावडे,नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर,करंजे सरपंच सपना मेस्त्री,गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे,नरडवे सरपंच बाबु सावंत,सांगवे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सावंत,ग्रामपंचायत सदस्य राजेश सापळे,राजु पेडणेकर,करूळ सरपंच सौसमृध्दी नर,कोंडीये सरपंच ऋतुराज तेंडुलकर,सुभाष सावंत,मयुरी मुंज,राजश्री पवार,स्मिता मालडीकर,महेश खादारे उपस्थित होते.यावेळी 120 मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचीऑपरेशन स्वामी विवेकानंद नेत्रालय कणकवली येथे मोफत करण्यात येणार आहेत.एकूण 250 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.हर्निया व ॲपेंडीस्क च्या 15 रुग्णाचे मोफत ऑपरेशन संदेश( गोट्या) सावंत व संजना संदेश सावंत यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.