आरोपी अवधूत शामराव वाळकेवर गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव तिठा येथे 950 रुपयांची अवैध दारू कासार्डे दुरक्षेत्र पोलिसांनी पकडली. अवधूत शामराव वाळके ( वय 42, असलदे, शिवाजीनगर ) याच्या ताब्यातून 950 रुपयांची अवैध दारू आज सकाळी 11 : 30 पकडली.कासार्डे दुरक्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे,पोलीस नाईक प्रवीण पार्सेकर यांनी ही कारवाई केली.पोलीस नाईक प्रवीण पार्सेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












