जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती 3 दिवस राहणार बंद ; ग्रामसेवकांसह ग्रा पं कर्मचारी संपावर

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करणाऱ्या सर्व कर्मचारी संघटनानी तीन दिवसाचे ऐतिहासिक कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ग्रामसेवक युनियन, सर्व संगणक परिचालक संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्रितरित्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १८ ते २० डिसेंबर या तीन दिवसाचे ऐतिहासिक कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायत विकासाच महत्वाचा भाग असून सुद्धा ग्रामपातळीवर काम करणाऱ्या कर्मचारी यांच्या न्याय मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्या जात आहेत. या विविध मागण्या कर्मचाऱ्यांच्या असून त्याबाबत सरकारच लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडल आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन देखील या संपात सहभागी झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतिचा कारभार पुढील तीन दिवस ठप्प राहणार असल्याचे समजत आहे.

error: Content is protected !!