केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्पना यात्रेला कळसुली गावात उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून, शासनाने राबविलेल्या विकसित भारत संकल्पना यात्रा आज कळसुली गावामध्ये संपन्न झाली. सदर यात्रेला कळसुली गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी सदर गावामध्ये दाखल झालेल्या यात्रेचे, यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी गावपातळीवरील तसेच तालुका पातळीवरील,विविध विभागाचे अधिकारी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.तसेच, क्षेत्रीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी, पंचायत समिती,कणकवली,सुर्यकांत वारंग,तसेच कृषी विज्ञान केंद्र,किर्लोस येथील अधिकारी, श्री काजरेकर, यांनी सुध्दा या उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच सदर यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थीनीही, मिळालेल्या लाभाची माहिती उपस्थितांना दिली. सदर यात्रेवेळी कळसुली गावातील नागरीकांची तसेच विशेषतः महिलांची उपस्थिती लाक्षणिय होती.त्यामुळे केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्पना यात्रेचा उद्देश खऱ्या अर्थाने कळसुली गावामध्ये सफल झाल्याचे आढळून आले. यावेळी कळसुली सरपंच,सचिन पारधिये,उपसरपंच, गणेश मठकर, ग्रामपंचायत सदस्य,शुभदा देसाई,भावना सावंत,राजेंद्र दळवी,मानसी दळवी,तंटामुक्ती गांव अध्यक्ष,प्रविण दळवी,ग्रामविकास अधिकारी,दिपक तेंडूलकर,तलाठी,उमेश शिंगनाथ,कृषी मंडळ अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक श्रीमती साक्षी सावंत,वैद्यकिय अधिकारी,कळसुली सब-पोष्ट मास्तर,तसेच कळसुली गावातील बचत गटांचे सर्व पदाधिकारी,आशासेविका,अंगणवाडी सेविका,कळसुली गावातील बचत गटांच्या महिला तसेच कळसुली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!