कणकवलीमध्ये सरबत, बाबांच्या भजन आणि जिल्हा पर्यटन सी डीचे वाटप…

कणकवली (प्रतिनिधी) : प. पु.भालचंद्र महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त, ५ व्या दिवशीच्या भव्य मिरवणूक निमित्ताने, माऊली मित्रमंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ (अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली) राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र व शालेय मित्रमंडळ आणि ॐ नमो भगवते भालचंद्राय यांच्यावतीने संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत सुभाष उबाळे,सी.आर.चव्हाण,भाऊ डगरे यांच्या हस्ते सरबत वाटप करण्यात आले.

सरबत वाटपानंतर सर्वच मंडळांच्या सदस्यांच्या हस्ते प. पु.भालचंद्र महाराज यांच्या भजनाच्या ऑडीवो कॅसेट वाटप आणि चला पर्यटनाला भेट द्या सिंधूदुर्गाला हि व्हिडिओ सीडी वाटप करण्यात आली.

यावेळी बाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांनी उपस्थितीत झाले होते. यावेळी बेळगाव येथील भाविकांची प्रतिक्रिया सर्वात बोलकी होती.याप्रसंगी सी. आर. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्वच मंडळाचे सदस्य व मंडळाचे आधारस्तंभ सर्व सल्लागार उपस्थितीत होते.यावेळी आमचे पत्रकार मित्र रविकांत जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या

error: Content is protected !!