खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स, आर्ट्स खारेपाटण तसेच उच्च माध्यमिक द्विस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम या संपूर्ण प्रशालेला पालक शिक्षक संघाकडून विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी ५० स्टूल्स नुकतेच भेट देण्यात आले.
यावेळी खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप, बांधकाम विभाग सहायक अभियंता बि जी कुमावत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव,माजी उपाध्यक्ष पांडुरंग पांचाळ,शाळेचे शिक्षक श्री.गुरसाळे,श्री शेट्ये,श्री.वरुणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विभगाच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये आणि ऑटो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या विभागातील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी हे स्टूल्स प्रदान करण्यात आले.असल्याचे पालक शिक्षक संघाच्या वतीने सगण्यात आले.
शाळेसाठी वस्तुरुप देण्यात आलेल्या या देणगीबाबत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर, उपाध्यक्ष भाऊ राणे, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर तसेच सर्व संचालक मंडळ आणि प्रशालेचे प्राचार्य संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.













