विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नवसाला पावणारे व भक्तांच्या हाकेला धावणारे चिंदर गावचे आराध्य दैवत आई भगवती माऊलीची दिंडे जत्रा २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. यात्रे निमित्त मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वा. यात्रेकरु भाविकांचे स्वागत, भगवती माऊली दर्शन, दु. १२.०० ते १.०० वा. श्री देवी भगवती माऊलीस मानकरी यांचा महाप्रसाद (नैवेद्य), रात्री ११.०० वा श्री देव रामेश्वर मंदिर ते श्री देवी भगवती मंदिर ग्राम देवतांचे (तरंगांचे) ढोला ताशाच्या वाद्यवृंदाने तसेच फटाक्याच्या आतषबाजीत आगमन, पहाटे ३.०० वा. पुराण, गोंधळ, किर्तन व दिंडेजत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीचे दिवटया नृत्य,
बुधवार दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी संध्या. ५.३० ते ६.३० श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, देऊळवाडी-भजन, रात्री ६.३० ते ७.३० श्री देव तेरई ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, तेरईवाडी-भजन, ७.३० ते ८.३० गोपीकृष्ण गुरुकुल भांडूप मुंबई यांचे भजन, बुवा भजन महर्षि गोपिनाथ बागवे, रात्रौ ९.०० नंतर पुराण, गोंधळ, किर्तन व श्री ची आरती.गुरुवार दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी संध्या. ४.०० ते ५.०० श्री सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळ, सडेवाडी-भजन, संध्या. ५.३० ते ६.३० श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पालकरवाडी-भजन,संध्या. ६.३० ते ७.३० श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, कुंभारवाडी-भजन, रात्री ७.३० ते ८.३० श्री देव वाडत्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, अपराज- कोंडवाडी-भजन, रात्री ९.०० नंतर पुराण, गोंधळ, किर्तन व श्री ची आरती,
शुक्रवार दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी संध्या. ५.३० संध्या. ६.३० श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, लब्देवाडी-भजन, ६.३० ते ७.३० श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, साटमवाडी-भजन, रात्री ७.३० ते ८.३० श्री देव आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ, गावठणवाडी-भजन. रात्रौ ९.०० नंतर पुराण, गोंधळ, किर्तन व श्री ची आरती.शनिवार दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० ते ६.०० चालू वहिवाटदार सर्व महिला अर्चना, अनिता, सुनिता, अंकिता घाडी यांच्या मार्फत हळदीकुंकू समारंभ आयोजन६ ते ७ श्री देव पिसाळी ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, तेरईचे-भजन, ७.०० ते ८.०० श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ, भटवाडी- भजन. रात्रौ ९.०० ते १०.०० पुराण वाचन, रात्रौ १०.०० वा. कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा नाट्यप्रयोग नाटक: “पराशक्ती दहन अर्थात भावई महिमा” स्थळ: श्री देवी भगवती रंगमंच सौजन्य वाळू गृप चिदर, रात्रौ २.३० नंतर गोंधळ किर्तन व श्री ची लळीत समाप्ती आरती, दिवट्या नृत्यासहित, भाविक भक्तांनी यात्रोत्सवासह विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती, चिंदर यांनी केले आहे.












