आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुका खरेदी विक्री संघ व ग्रामपंचायत पळसंब यांच्या संयुक्त विद्यमाने पळसंब ग्रामपंचायत येथे उज्वला गँस योजनेतील 65 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनाचा KYC कार्यक्रम पळसंब सरपंच महेश वरक यांच्या पुढाकारने खरेदी विक्री संघ चेअरमन राजन गांवकर यांच्या उपस्थितीत पारपडला.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश लाड, माजी सदस्य उज्वला परब, भारत गँसचे सहकारी कर्मचारी नंदकिशोर शेलटकर, स्वप्नील गावडे, किरण मालवणकर, निलेश भोजने, अशोक जुवेकर तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.












