कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठात झालेल्या विद्यापीठ स्तरीय (इंटर झोनल) ५७ ते ६३ किलो वजनी गटातील जुडो स्पर्धेमध्ये कणकवली कॉलेजची विद्यार्थिनी कु.महेक शेख हिने तुतीय क्रमांक प्राप्त केला आहे.कुमारी महेक शेख हिने सलग दुसऱ्या वर्षी हे यश प्राप्त केले आहे.
महेक शेख हिच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे,चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे,सचिव विजयकुमार वळंजू,प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे,जिमखाना विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी अभिनंदन केले आहे. महेकच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.













