कनकनगर बंधारा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

कणकवली (प्रतिनिधी): गडनदीपात्रात कनकनगर बंधारा येथे अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज असून पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जात प्राथमिक पाहणी केली. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

error: Content is protected !!