अ.भा.अनिसची २५ डिसेंबर रोजी कणकवलीत विशेष सभा

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गची विशेष सभा अँड.राजीव बिले यांचे अध्यक्षतेखाली सोमवार २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा .शासकिय विश्राम गृह कणकवली येथे आयोजित केली आहे.या सभेमध्ये राज्य संघटक हरीभाऊ पाथोडे,राज्य उपाध्यक्ष रविद्र खानविलकर व शशी गमरे हे राज्य पदाधिकारी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत

२० डिसेंबर २०२३ संत गाडगेबाबांचा स्मृती दिन ते ३ जानेवारी २०२४ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन.या पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये बाबा ते ज्योती प्रबोधन यात्रेचे आयोजन राज्यभर करण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही या प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने विविध ठिकाणी व्याख्यानाचे आयोजत करण्यात आले आहे.या बाबत राज्य पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.या प्रबोधन यात्रेच्या निमिताने अजूनही जिल्हातील विविध शाळा,कॉलेज तसेच गावागावामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.या सभेला सर्व कार्यकारीणी पदाधिकारी,सदस्य,हितचिंतक आणि सुजाण नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर व जिल्हा सचिव अजित कानशिडे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!