किमान आधारभूत दराने भात खरेदी,शेतकऱ्यांसाठी वरदान ठरावे – बबन हळदिवे
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टेट को- ऑफ मार्के. फेडरेशन लि. मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने .,आणि उप अभिकर्ता संस्था, कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, लि. यांचे मार्फत फोंडाघाट विकास सह. सेवा सोसा. लि. येथे किमान आधारभूत दराने २०२३-२४ अंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल २१८३ रुपये दराने भात खरेदीचा शुभारंभ नुकताच पार पडला. यावेळी मान्यवरांचे उपस्थितीत शेतकऱ्यांकडून आलेल्या भाताच्या गोणीचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी बोलताना शासनातर्फे होत असलेली किमान आधारभूत भात खरेदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून, कुणाचीही फसगत न होता, भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरच जमा होणार आहे.असे मत कणकवली संघाचे संचालक बबन हळदिवे यांनी व्यक्त केले. सोसायटी चेअरमन राजन नानचे यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आवाहन करताना,आपले भात पीक नोंद केलेले सातबारा, आधार कार्ड ,बँक पासबुक, मोबाईल व शेतकरी यांनी स्वतः कार्यालयात येऊन नोंदणी करून घ्यावी.आणि फोंडाघाट सोसायटीमध्ये भात विक्री करून, शेतकऱ्यांनी निश्चिंत व्हावे.यावेळी संघाचे संचालक पिंटू पटेल, सोसायटी संचालक नागेश कोरगावकर , ध्रुवबाळ गोसावी, विश्वनाथ जाधव, शेतकरी अशोक लाड,काका पारकर, वासुदेव पारकर, गुरव, क्लार्क मिलिंद तावडे आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.













