श्री पावणादेवी मंडळ सोनाळी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री पावणादेवी मंडळ सोनाळी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले. शिबिरास उपस्थित असलेल्या जयवंत पवार या रक्तदात्याच्या हस्तेच कार्यक्रमाचे उद्घाटन करुन एक नवीन आदर्श मंडळाने याप्रसंगी घालून दिला. मंडळ केवळ क्रिकेट स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल सोनाळी गावातील ग्रामस्थांच्या वतीने मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.

या रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. एस.एस.पी.एम. हॉस्पिटल पडवे यांच्या कर्मचारी वर्गाने रक्तसंकलन करुन मंडळाला सहकार्य केले.रक्तदान शिबिर प्रसंगी सभापती अरविंद रावराणे, सरपंच भीमराव भोसले, उपसरपंच श्रेया कदम, पोलीस पाटील राजेंद्र रावराणे, जयवंत पवार, मारुती पाटील, बाबा कोदे, प्रकाश शेलार, समाधान जाधव आदी मान्यवर तसेच मंडळ अध्यक्ष सुयोग गुरव, व्यवस्थापक प्रशांत पवार, उपाध्यक्ष समाधान गुरव, सदस्य नितेश शेलार, अनिल कदम , सुदेश गुरव, महेंद्र नर, सुबोध गुरव, स्वप्नील गुरव, विनोद रावराणे, महेश रावराणे, प्रमोद रावराणे, संकेत नर, शुभम गुरव, विद्याधर शेलार, ऋतिक पवार, आदित्य पवार, मंदार पवार, दीपक कारेकर, नितेश गुरव, समीर कोदे, विक्रांत शेलार, रवींद्र शेलार आदी रक्तदाते उपस्थीत होते.

error: Content is protected !!