वैश्य समाज पतसंस्थेचे नूतन संचालक सुनील कोरगावकर, उमेश वाळके यांचा माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्याकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था मर्यादित फोंडाघाट च्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल नूतन संचालक सुनील कोरगावकर, उमेश वाळके यांचा माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. वैश्य समाज पतसंस्था निवडणुकीत आज ओरोस येथे झालेल्या मतमोजणीत शिवसेना उबाठा चे कणकवली शहरप्रमुख उमेश वाळके हे विजयी झाले. त्यानंतर कणकवलीत आगमन झाल्यानंतर बाजारपेठ येथील महापुरुष मंदिरात नूतन संचालक सुनील कोरगावकर व उमेश वाळके यांचा माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, चेतन अंधारी, हर्षद अंधारी, भैय्या आळवे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!