चिंदर यात्रोत्सवा निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर.!

डाँ. गद्रे नेत्र रुग्णालय, मालवण, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत चिंदर यांचे संयुक्त आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : आई भगवती माऊली यात्रा चिंदर व श्री दत्त जयंती उत्सव यांचे औचित्य साधून डाँ. गद्रे नेत्र रुग्णालय, मालवण, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत चिंदर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य उपकेंद्र चिंदर’ येथे मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत “मोफत नेत्र तपासणी” शिबिर आयोजित केले आहे.या शिबिराची वैशिष्ट्ये, काँम्युटरव्दारे अचूक चष्मा नंबर व मोतीबिंदू निदान, मोतिबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात, सवलतीच्या दरात चष्मा वाटप, मशिनव्दारे मोतिबिंदू शस्रक्रिया(फोल्बेबल लेन्स) अशी असून यात्रे करु भाविकांनी, नेत्र रुग्णांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत व उपसरपंच दिपक सुर्वै यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!