तरंदळे येथील ग्रामस्थांनी केला कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच तरंदळे येथील सामजिक कार्यकर्ते प्रसाद सावंत यांचे सुपुत्र विनय सावंत यांनी आपले मित्र कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची आज भेट घेऊन तरंदळे गावच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या साेबत तरंदळे सरपंच सुशिल कदम, माजी सरपंच तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष सुधिर सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुनील दत्त जाधव,सामाजिक कार्यकर्ते – प्रसाद सावंत, अनंत सावंत, मधुसूदन सावंत उपस्थित होते. यावेळी गावातील महसुली बाबत तसेच विविध विषयावर चर्चा केली.

error: Content is protected !!