पार्थ गोसावी प्रथम, अंजली गोसावी व्दितीय तर ललना पाटणकर तृतीय
उत्तेजनार्थ-हर्षाली तोडकर प्रथम, प्रिंयाका वराडकर व्दितीय तर दिव्या गोसावी तृतीय
चिंदर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत चिंदर व चिंदर सेवा चिंदर यांच्या वतीने चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच तथा उद्योजक संतोष कोदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच दिपक सुर्वै यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धैत 14 स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्पर्धेत पार्थ गोसावी प्रथम, अंजली गोसावी व्दितीय तर ललना पाटणकर हिने तृतीय क्रमांक मिळवीला. उत्तेजनार्थ हर्षाली तोडकर प्रथम, व्दितीय प्रियांका वराडकर, दिव्या गोसावी तृतीय क्रमांक मिळवला.
यावेळी सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वै, चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्री, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, चिंदर सेवा संघ खजिनदार गणेश गोगटे, कार्यवाह सिध्देश गोलतकर, चिंदर सेवा संघ सल्लागार भाई तावडे, उपाध्यक्ष विवेक (राजु) परब, पोलिस पाटील दिनेश पाताडे, सिध्देश नाटेकर, समिर अपराज, स्वानंद सुर्वै आदी उपस्थित होते स्पर्धेचे परिक्षक म्हणून रांगोळीकार विशाल गोलतकर यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी सिध्देश गोलतकर, मोरेश्वर गोसावी, गणेश गोगटे यांनी मेहनत घेतली.